नवी दिल्ली | भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन झाले आहे. त्यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी प्रणव मुखर्जी यांच्या निधनाची बातमी ट्विट करत दिली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. प्रणव मुखर्जी यांची प्रकृती काही दिवसांपासून अधिकच ढासळत होती. फुफ्फुसातील संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये असल्याचे आज सकाळी लष्करी रुग्णालयाने सांगितले होते.
Former President Pranab Mukherjee passes away, announces his son Abhijit Mukherjee. pic.twitter.com/3SFxmRE21j
— ANI (@ANI) August 31, 2020
प्रणव मुखर्जी यांची कोरोना चाचणी १० ऑगस्टला पॉझिटिव्ह आली होती. लष्कराच्या रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर झालेली ब्रेन सर्जरी यशस्वी ठरल्याची माहिती आहे. मेंदूतील रक्तगाठ (ब्लड क्लॉट) काढण्यासाठी ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान उपचारांती त्यांचे निधन झाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.