HW News Marathi
Covid-19

अभिनेता सुबोध भावे आणि त्याच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण

मुंबई | संपूर्ण जगात पसरलेल्या या विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक कलाकार, राजकीय नेते देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान प्रसिद्ध मराठी अभिनेता सुबोध भावे आणि त्याच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

https://www.instagram.com/p/CEi9UJ4hyn0/?igshid=1mihdseswnmtw

“मी, मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे. आम्ही तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने उपचार घेत आहोत. तुम्ही सगळे काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. गणपती बाप्पा मोरया.” अशी माहिती सोशल मीडियावरून सुबोधने कोरोनाची लागण झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाबाधित रुग्णांकडून उपचारासाठी दुप्पट बिल आकरणाऱ्या रुग्णालयांना पालिकेचा धक्का!

News Desk

#SushantSinghRajput Case | बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी केली CBI चौकशीची शिफारस

News Desk

राज ठाकरेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पत्रातून ‘ही’ मागणी

News Desk