HW News Marathi
Covid-19

दरेकर जॅकेट घालून आरसा पाहून टीव्हीसमोर येतात, ह्याला सरकारला घेरणं म्हणत नाहीत !

मुंबई | “काही लोक येड्यासारखे बोलत आहेत. प्रवीण दरेकर जॅकेट घालून आरसा पाहून टीव्हीसमोर येतात. मी कसा दिसतो असं कॅमेरामनला विचारतात. याला सरकारला घेरणं म्हणत नाहीत”, अशी बोचरी टीका राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून १३ रूग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. याच पार्श्वभूमीवर, प्रवीण दरेकर यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सडकून टीका केली आहे. ते टीव्ही९ मराठीशी बोलत होते.

नवाब मलिक यावेळी म्हणाले कि, “काही लोक येड्यासारखे बोलत आहेत. उठसूट जॅकेट घालून कॅमेऱ्यासमोर येत आहेत. प्रतिक्रिया देण्यापूर्वी आरश्यात पाहून मी कसा दिसतो असं कॅमेरामनला विचारतात. काही विरोधी पक्षनेते तर कार्यालयात बसून केवळ प्रतिक्रिया देण्याचेच काम करत आहेत. राज्यात फायर ऑडिट केल्याशिवाय कोणत्याही रुग्णालयाला परवानगी देण्यात येत नाही. खासगी रुग्णालयात कधी कधी एसीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागते. अशावेळी सरकारला जबाबदार धरणं योग्य नाही. सरकारला कोणी घेरण्याचा प्रश्नच आहे”, असे नवाब मलिक म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात सध्या सुरु असलेले हे राजकारण हा करमणुकीचा भाग !

News Desk

महानायक ‘अमिताभ बच्चन’यांना कोरोनाची लागण

News Desk

कोरोना टेस्टींगमध्ये महाराष्ट्र नंबर १, राज्यात दररोज ७००० पेक्षा जास्त टेस्ट होतात !

News Desk