HW News Marathi
महाराष्ट्र

लोकांच्या मनातून कोरोनाची भीती घालवायची आहे !

मुंबई | राज्यातील मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर पंढरपुरात दाखल झाले आहेत. पंढरपुराला छावणीचं स्वरुप आलं आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमल्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला आहे. याबाबत प्रश्न विचारला असता. आपण नियम मोडण्यासाठीच आलो असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना आणि आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं आहे. तसेच आंदोलकांनी अंतर ठेऊन उभे राहण्याचं आवाहन देखील आंदोलकांना केलं आहे.

कोरोनाची भीती लोकांच्या मनातुन घालवायची आहे. सरकारकडून अजून कोणीही माझ्याशी बोललेलं नाही. दारू, दुकान, एसटी असं सगळं सुरू केलं. मोबाईलच्या माध्यमातून कोरोनाची भीती पसरवली जात आहे. लोकांच्या भावना असलेली धार्मिक स्थळ सुरू करावी. सरकारने अंत पाहू नये, आजची परिस्थिती बघून सरकार लवकर निर्णय घेईल असं वाटतं. माझ्या प्रत्येक आंदोलनाला यशच आलं आहे. त्यामुळे मंदिर लवकरच खुली होतील, दुसरं काही करायची गरज पडणार नाही. असं देखील प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठीचा अपमान होताना शिवसेना गप्प होती : अजित पवार

News Desk

काँग्रेस पक्षाने कारवाई करत सत्यजीत तांबे यांना केले निलंबित; नाना पटोलेंची माहिती

Aprna

मी जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा…

News Desk