HW News Marathi
देश / विदेश

मोदींच्या ‘मन की बात’ व्हिडिओला ४ लाखांपेक्षा जास्त डीसलाईक

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अनेक भाषणे हिट होतात. त्यांच्या भाषणांना प्रचंड गर्दी होते. तसेच टीव्हीवर देखील लाखोंच्या संख्येने लोकं त्यांची भाषणं पाहतात. मात्र काल (३० ऑगस्ट) ‘मन की बात’मधून पंतप्रधान मोदींनी देशवासियांशी साधलेला संवाद लोकांच्या पसंतीस उतरलेला नाही. ४ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ डिसलाईक केला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी काल रेडिओद्वारे भारतीयांशी मन की बातमधून संवाद साधला. भारतीय जनता पक्षाच्या युट्यूब चॅनेलवरून हा व्हीडिओ रिलीज करण्यात आला. हा व्हीडिओ ११ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पहिला आहे तर ६७ हजारपेक्षा जास्त लोकांनी लाईक केला आहे. मात्र हैरान करणारी बाब म्हणजे ४ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ डिसलाईक केला आहे. तसेच, या व्हिडिओ वर अनेकांच्या मिश्र कमेंट्स देखील येत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांकडून आयईडी स्‍फोट, ६ जण जखमी

News Desk

‘उत्तराखंडाचे मुख्यमंत्री तीरथ सिंह यांचा राजीनामा’

News Desk

नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणाऱ्या प्रज्ञा सिंह यांनी सार्वजनिक माफी मागावी | भाजप

News Desk