HW News Marathi
महाराष्ट्र

“आज मला शरद पवारांची खुप आठवण येतेयं…”

नाशिक | लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (ACB) माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल केल्याची बातमी समजली तेव्हापासून मला शरद पवार साहेबांची खूप आठवण येत आहे, असे वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले आहे. मला आजही आठवते की, ५ जुलै २०१६ रोजी माझ्या पतीवर आरोप झाले. त्यानंतर ७ जुलैला ईदच्या दिवशी मी शरद पवार यांना भेटायला गेले. त्यावेळी शरद पवार यांनी माझ्याकडे एफआयआरची प्रत मागितली. ही प्रत नीट वाचल्यानंतर तुझा नवरा या सगळ्यात कुठेच नाही, असे शरद पवार यांनी मला सांगितले. त्यामुळेच आज सकाळपासून मला शरद पवार साहेबांची खूप आठवण येत आहे, असे चित्रा वाघ यांनी सांगितले आहे.

चित्रा वाघ आज (२७ फेब्रुवारी) नाशिक येथील पत्रकारपरिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणावरून महाविकासआघाडी सरकारची अक्षरश: लक्तरे काढली. याप्रकरणात मी सातत्याने आवाज उठवत असल्यामुळेच माझे पती किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशी करायची होती तेव्हा एसीबीच्या अधिकाऱ्यांनी माझ्या पतीला घरी येऊन नोटीस दिली. पण आता त्यांच्यावर गुन्हा दाखल केला तर एसीबीला त्यांना कळवावेसे वाटले नाही का? एसीबीकडे माणसे उरली नाहीत का, असा संतप्त सवाल चित्रा वाघ यांनी विचारला आहे.

माझ्या नवऱ्याला रोज टॉर्चर केलं जातंय – चित्रा वाघ

ही लाच घेतल्याचे प्रकरण घडले तेव्हा माझे पती किशोर वाघ घटनास्थळापासून पाच किलोमीटरच्या परिसरातही नव्हते. याप्रकरणात मुख्य आरोपी असलेले गांधी रुग्णालयाचे तत्कालीन महानिरीक्षक गजानन भगत यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यांची अजून चौकशीच सुरु आहे. २०११ पासून एसीबीच्या अनेक केसेस पेंडिंग आहेत. पण आता माझ्या नवऱ्यावरच गुन्हा दाखल कसा करण्यात आला, असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला.

एसीबीने ज्याप्रकारने तातडीने गुन्हा दाखल केला त्यासाठी मी गृहमंत्र्यांना तीनदा सॅल्यूट ठोकते. मी पूजा चव्हाण प्रकरणात आवाज उठवत असल्यामुळे माझ्या पतीला अटक करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्यावर रोज दबाव आणला जातोय, त्यांना टॉर्चर केले जात आहे. पण मला न्यायव्यस्थेवर विश्वास आहे, ती सरकारसारखी मुर्दाड नाही. मी या सरकारला एकटी पुरून उरेन. मी तुमच्यासोबत २० वर्षे काम केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘खायचं कुणाचं आणि गायचं कुणाचं?’, चित्रा वाघांचा राऊतांवर निशाणा

News Desk

सोलापूरचे पालकमंत्री बदलणार का? जयंत पाटील म्हणाले…

News Desk

भास्कर जाधवांच्या कृतीवर देवेंद्र फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया..!

News Desk