जळगाव | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद सगळ्यांनाच माहित आहे. आता यांच्यावरुनच एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. हा वाद एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे आणि भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यात रंगला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकनाथ खडसेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांनी हल्ला केला होता. त्यानंतर सातपुतेंना उत्तर देताना खडसेंच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे खेवलकर यांनी “तुम्ही नागपुरी बांगड्या भरला होत्या का?” असा सवाल विचारला. त्यानंतर रोहिणी खडसे आणि सातपुते यांच्यात ट्विटरवॉर रंगलं आहे.
रोहिणी खडसे यांनी नागपूरच्या बांगड्या भरल्या होत्या का असा सवाल विचारल्यानंतर राम सातपूते यांनी त्यावर पलटवार केला आहे. “ताई भोसरी जमीन घोटाळ्यामुळे मंत्रीपद गेलं ना हो नाथाभाऊंचं. या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे तीच कारवाई झाली ना तेव्हा. आणि यामुळेच आपला २०१९ ला मुक्ताईनगरच्या जनतेने पराभव केला. कशाला बोलायला लावता ताई..? बात निकली ही है तो दूर तक जायेगी ..!” असा टोला लगावला आहे.
भोसरी जमीन घोटाळा ..
ताई मंत्रीपद गेलं ना हो नाथाभाऊंच या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळं तीच कारवाई झाली ना तेव्हा .
आणि यामुळेच आपला 2019 ला मुक्ताईनगर च्या जनतेने पराभव केला.
कशाला बोलायला लावता ताई..?बात निकली ही है तो दूर तक जायेगी ..! @Rohini_khadse https://t.co/3HWxedohcI
— Ram Satpute (@RamVSatpute) April 18, 2021
काय म्हणाले होते राम सातपूते?
‘देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून माशासारखे तडफडत आहेत’ अशा शब्दात एकनाथ खडसेंनी फडणवीसांवर टीका केली होती. त्यावर बोलताना “नाथाभाऊ आपण आयुष्यभर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केलं नाही आणि देवेंद्र भाऊबद्दल बोलत आहात. विरोधी पक्षनेता असताना तोडपाणी आणि मंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचार. निष्कलंक देवेंद्रजीवर बोलण्या गोदर आरसा बघा सगळं लक्षात येईल” असं ट्वीट राम सातपुतेंनी केलं होतं.
रोहिणी खडसे यांचं प्रत्युत्तर
“अहो जर पैसे खात होते तर मग सत्ता होती तेव्हा कारवाई का केली नाही? तेव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का? आणि असेल तुमच्यात हिंमत तर सिद्ध करा ना? शामराव फडणविशी मिरची तुम्हाला का झोंबली? ज्यांचे बद्दल बोलले त्यांच्या तोंडात काय मिठाची गुळणी आहे का?” अशी घणाघाती टीका रोहिणी खडसेंनी केली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.