HW News Marathi
महाराष्ट्र

जे अध्यक्ष पदाचा निर्णय घेऊ शकत नाहीत, ते पुढचे निर्णय कसे घेणार?

मुंबई | काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून सध्या राजकारणात गोंधळ सुरू आहे. यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आता वक्तव्य केले आहे. महाविकास आघाडीबद्दल काँग्रेसच्या मंत्र्यांचं काय मत आहे याकडे आम्ही लक्ष देणार नाही. जो पक्ष स्वत:चा अध्यक्ष ठरवू शकत नाही, तो पक्ष पुढचे निर्णय काय घेणार, असा टोला यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदाबद्दल सध्या जोरदार सगळीकडे चर्चा सुरू आहे.

काँग्रेसचे भविष्यातील अध्यक्ष गांधी कुटुंबातील असावा की बाहेरील, यावरून पक्षात दोन गट पडले आहेत. देशभरातील काँग्रेसचे नेतेही त्यांची मते मांडत आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेतेही यात मागे नाहीत. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधी यांच्या नावाला ठाम पाठिंबा दिला आहे. वडेट्टीवार यांनी तर त्यांच्याही पुढे जाऊन अध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधी यांनी सांगितल्यास राज्यातील सत्ताही सोडू, असे विधान केलं आहे. त्यामुळे राज्यातील सरकारच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

दरम्यान, वडेट्टीवारांच्या या विधानाबद्दल प्रश्न विचारला असता, “या सगळ्याकडं आता आम्ही फार लक्ष देत नाही. एका अध्यक्षपदावरून त्यांच्यात इतके वाद सुरू आहेत. सोनिया गांधींना अध्यक्षपदी राहायचं नाही. पण त्यांनाच राहावं लागतं आहे. जे अध्यक्ष पदाचा निर्णय घेऊ शकत नाहीत, ते पुढचे निर्णय कसे घेणार?, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. इतक्या मोठ्या पक्षाची अशी अवस्था का झाली याचं आत्मचिंतन करायला हवं, असा टोलाही त्यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांंना सुनावले!

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर

News Desk

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावर आता १७ जानेवारीला होणार सुनावणी

Aprna