HW News Marathi
Covid-19

मी कोरोना रोखण्यासाठी फिरत आहे, आणि जर माझ्यावर गुन्हा दाखल केला तर…

अहमदनगर |अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊनची मागणी करणारे नगर दक्षिणचे भाजप खासदार डॉ.सुजय विखे पाटील हे मात्र, गेल्या काही दिवसांपासून के.के.रेंजच्या प्रश्नावर गावोगावी ४०० पेक्षा जास्त लोकांच्या बैठका घेत त्यांच्याशी चर्चा करत आहेत.या बैठकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण पणे फज्जा उडत आहे.दरम्यान, त्यांच्या या बैठकांमुळे खासदारांना कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवायचा आहे की, वाढवायचा आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा उद्रेक लक्षात घेऊन विखे यांना नगर जिल्ह्यात फिरण्यास बंदी घालावी, अशी मागणी मनसेचे नितीन भुतारे यांनी केली होती.

मनसेच्या या मागणीवर अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ” मी कोरोना रोखण्यासाठी जिल्ह्यात फिरत आहे. काही ठिकाणी बैठका घेतल्या. त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र जर माझ्यावर गुन्हा दाखल करायचा असेल तर मी तयार आहे, ” असे ते म्हणाले.

“यासोबतच त्यांनी जर माझ्यावर गुन्हा दाखल करणार असाल तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावरही गुन्हा दाखल करा असा घणाघात त्यांनी.केला आहे. “माझ्या एकट्यावरच नव्हे तर पारनेरमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोविड सेंटरचे उद्घाटन केले. त्यांच्यासह या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या ३०० लोकांवरही गुन्हे दाखल करा,”अशी मागणी करत राजेश टोपेंवर सुजय विखेंनी टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना चाचण्यांच्या दरात घट, आरोग्य विभागाचा निर्णय

News Desk

शरद पवारांनी घेतला पुढाकार ! ऑक्सिजन टंचाईची समस्या सोडवण्यासाठी ‘या’ सूचना

News Desk

कोरोना संसर्गाबाबतचे दक्षता नियम न पाळणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करा -अजित पवार

News Desk