HW News Marathi
Covid-19

…तर कोरोनाचे जंतू फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते! शिवसेना आमदाराची जीभ घसरली

बुलढाणा | महाराष्ट्रात कोरोना परिस्थितीमध्ये सध्या राजकारणास चांगलाच ऊत आला आहे. या परिस्थितीत शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया देत असताना जीभ घसरली आहे. फडणवीसांवर टिका करताना त्यांनी अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे.

फडणवीसांवर आणि भाजपवर टिका करताना संजय गायकवाड काय म्हणाले ?

यावेळी बोलताना म्हणाले की ,भाजपच्या लोकांचे नीच राजकारण महाराष्ट्र उभ्या डोळ्याने पाहतोय,देवेंद्र फडणवीस,प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील. हा कोरोना कोण कोणत्या पक्षाचा आहे,हा कोरोना राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता आहे का हे पाहुन येत नाही, तर हा कोरोना प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला वीळखा घालत आहे. भाजपाने हे विसरु नये त्यांच्या १०५ आमदाराना देखील महाराष्ट्रातील जनतेने मतदान केले आहे, त्यांचे २० खासदार देखील महाराष्ट्राने निवडून दिले आहे, अशावेळी केंद्रांकडून राज्यातील वॅक्सीन कंपन्यांना सांगितलं जात की तुम्ही महाराष्ट्राला लस, तसेच रेमडिसिवर देऊ नका. राज्याने ऑक्सीजनची देखील मागणी केली तरी केंद्र सरकार देत नाही. ५०,००० इंजेक्शन भाजपा कार्यालयातून गुजरात मध्ये फुकट दिल्या जातात, महाराष्ट्रात लोक तडफडतात, अशा प्रकारचे नीच आणि गली गलिच्छ राजकारण भाजपा सरकार करत आहे, हे या जगामध्ये,या देशामध्ये कोणीच केल नाही. आज त्यांना बांग्लादेश, पाकिस्तान, नेपाळल दयायला वॅक्सीन आहे, इंजेक्शन आहे, मग महाराष्ट्र काय ह्या सर्वांपेक्षा गया-गुजरा आहे का ? की आपल्या लोकांना देऊ नये म्हणून ही राजकारण करायची वेळ आहे का,? अशावेळी त्या मोदी सरकारला आणि फडणवीसांना लाज वाटायला पाहिजे की तुम्ही राजकारण कुठे करता. मला जर कोरोनाचे जंतु सापडले असते तर मी त्या फडणवीसांच्या तोंडात जावून कोंबले असते,असे गायकवाड म्हणाले.

पुढे ते असही म्हणाले की, इतका तिरस्कार ह्या लोकांबद्दल माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे, आणि म्हणून ह्या लोकांनी राजकारण न करता लोकांना मदत करावी.पहिले हा महाराष्ट्र जगला पाहिजे,माणूस जगला पाहिजे नंतर तुमचे राजकारण आहे. अरे माणसच मरतील तर तुम्हाला शिक्के कोण मारणार आहे, कोण मतदान करेल तुम्हाला, हे लक्षात घ्या आणि नंतर तुमचे गलिच्छ राजकारण करा…अशा शब्दांत त्यांनी भाजपच्या राजकारणावर ताशेरे ओढले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जगात कोरोनाबाधितांचा आकडा ३५ लाखांच्या पुढे, बरे होणाऱ्यांची संख्या ११ लाखांच्या पुढे

News Desk

राज्यात सध्या सुरु असलेले हे राजकारण हा करमणुकीचा भाग !

News Desk

राज्यात अजून १५ दिवसांच्या लॉकडाऊनची आवश्यकता – राजेश टोपे

News Desk