रायगड | ‘देव तारी त्याला कोण मारी’, याचा प्रत्यय रायगडमधील इमारत दुर्घटनेच्या बचावकार्यादरम्यान आला. काल (२४ ऑगस्ट) महाडमधील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखालून लहान मुलाला सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. तब्बल १८ तासांनंतर ६ वर्षांच्या या चिमुकल्याला ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढण्यात NDRF ला यश आले आहे.यावेळी सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान होते. टाळ्यांच्या कडकडाट झाला. शिवाय गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणाही देण्यात आल्या.
T5️⃣
ʀᴀɪɢᴀᴅ ᴄᴏʟʟᴀᴘsᴇ Update👇25/8/20
🔶 𝕄𝕀ℝ𝔸ℂ𝕃𝔼-ℂℍ𝕀𝕃𝔻 ℝ𝔼𝕊ℂ𝕌𝔼𝔻 𝔸𝕃𝕀𝕍𝔼-God’s Child🙏🏻
🔶@NDRFHQ teams find 4 yr old Boy
🔶ops will continue
🔶Canines used
🔶Let’s All pray for more miracles 🙏🏻🇮🇳@PMOIndia @HMOIndia @PIBMumbai @PIBHomeAffairs @ANI pic.twitter.com/nJ3q436GGX— ѕαtчα prαdhαnसत्य नारायण प्रधान ସତ୍ୟ ପ୍ରଧାନ (@satyaprad1) August 25, 2020
तारीक गार्डन इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी रहिवासी संबधित बिल्डरकडे करत होते. मात्र, नगरपरिषदेत तक्रारी करु नका मी दुरुस्ती करुन देतो अशी बोळवण या बिल्डरकडून केली जात होती, अशी माहिती या इमारतीमधील रहिवाशांनी दुर्घटनेनंतर दिली. दुर्घटना घडल्याच्या दिवशी सकाळी इमारतीच्या पार्किंगमधील एक खांब ढासळल्याची बाब या इमारतीच्या रहिवाशांनी या बिल्डरच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र, मी प्लास्टर करुन देतो, अशी रहिवाशांची समजूत काढून त्याने पुन्हा रहिवाशांची समजूत काढली होती. त्यानंतर सुमारे सात तासांतच ही इमारत पूर्णपणे कोसळली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.