HW News Marathi
महाराष्ट्र

“मामु शिवभोजन थाळी खानेका है, लेकिन जानेका कैसे?”, गोपिचंद पडळकरांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल

मुंबई | कोरोनाचा राज्यातील वाढता प्रसार रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने राज्यात १५ दिवस संचारबंदी लागू केली आहे. अनेक कडक निर्बंध लागू करण्यात आले असून या काळात शिवभोजन थाळी ही मोफत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र, शिवभोजन थाळीच्या याच मुद्द्यावरून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल केला आहे.

राज्यात रोज होत असलेली मोठी रुग्णवाढ आणि आरोग्य सुविधांचा तुटवडा या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. तसेच, या काळात शिवभोजन थाळी मोफत देणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.

“माननीय मुख्यमंत्री (मा .मु.) कुछ समझ में नही आया… मामु शिवभोजन थाळी खानेका है… लेकिन जानेका कैसे?”, असा सवाल करत गोपीचंद पडळकरांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना पोलीस अडवताना दिसत आहेत. तर काहींना घराबाहेर पडले म्हणून शिक्षा देताना दिसत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर इंदोरीकर महाराजांचे शिवाजी विद्यापीठातील कीर्तन रद्द

swarit

अजित पवारांचे वक्तव्य म्हणजे अपरिपक्वता – पंकजा मुंडे

News Desk

केजरीवाल ध्यानधारणेसाठी इगतपुरीत

News Desk