HW News Marathi
Covid-19

मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन हवा – महापौर किशोरी पेडणेकर

मुंबई | महाराष्ट्रातील कोरोना आकडेवारी पाहून मुख्यमंत्री उद्धन ठाकरे यांनी १४ एप्रिलला संध्याकाळी ८ वाजल्यापासून राज्यात संचारबंदी लागू केली आहे.मात्र, या संचारबंदीत जीवनावश्यक सेवांसोबतच काही इतर सेवा आणि उद्योगांना देखील यातून सूट देण्यात आली आहे. तसेच, सामान्य नागरिकांना देखील काही किरकोळ कारणांसाठी घराबाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, आता यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शहराच्या प्रथम नागरिक म्हणून आपली भूमिका मांडली आहे. “कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहाता संपूर्ण लॉकडाऊन लागू करायला हवा”, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

मुंबईत अजूनही लोकं रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसत आहे. यामुळे मुंबईतल्या ५ टक्के बेजबाबदार नागरिकांमुळे उरलेल्या ९५ टक्के नागरिकांना अडचण होत असल्याचं महापौर म्हणाल्या आहेत. “९५ टक्के मुंबईकर कोरोनाच्या नियमांचं पालन करत आहेत. पण ५ टक्के लोकं निर्बंधांचं पालन करत नसल्याने त्यांच्यामुळे इतरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासाठीच मला वाटतं सध्याची परिस्थिती पाहाता संपूर्ण लॉकडाऊन लागू करायला हवा”, असं महापौर म्हणाल्या आहेत.

तसेच, गेल्या ३ दिवसांपासून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आपण प्रयत्न करत होतो. परंतु १० टक्के लोकं अजूनही बाहेर फिरत आहेत, ही वस्तुस्थिती त्यांनी सर्वांसमोर ठेवली. बाळासाहेब ठाकरे सेंटरमध्ये रुगांची संख्या वाढली तसं आम्ही लगेचच रुग्णांना दुसरीकडे हलवलं आहे असं म्हणत ऑक्सिजन पुरवठ्याच्या अनुषंगाने पालिका प्रशासन कंत्राटदारांच्या संपर्कात असल्याची महत्त्वपूर्ण माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

कुंभमेळ्याहून लोकं प्रसाद म्हणून ‘कोरोना’ घेऊन येतायत! – किशोरी पेडणेकर

यावेळी कुंभमेळ्याहून परत येणाऱ्या नागरिकांना क्वॉरंटाईन करण्याचा विचार आम्ही करत असल्याचं देखील महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे. “कुंभमेळ्याहून आपापल्या राज्यात जाणारी लोकं सोबत ‘प्रसाद’ म्हणून कोरोना आणत आहेत. या सर्व लोकांना त्यांच्या त्यांच्या राज्यांमध्ये क्वॉरंटाईन करायला हवं. त्याचा खर्च त्या लोकांकडूनच घ्यायला हवा. मुंबईत देखील आम्ही कुंभ मेळ्याहून परतणाऱ्या नागरिकांना परतल्यानंतर क्वारंटाईन करण्याचा विचार करत आहोत”, असं पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज ८४१ नवीन रुग्णांचे निदान, राज्यात एकूण १५ हजार ५२५ रुग्ण

News Desk

कल्याण-डोंबिवलीमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला

News Desk

लस घेतल्यानंतर कोरोना झाला तरीही….! आरोग्य मंत्रालयाची महत्त्वपूर्ण माहिती

News Desk