HW News Marathi
Covid-19

“पुण्यात कोण तुमचं ऐकत नाही आणि तुम्ही महाराष्ट्राला धमकी देतात?”

पुणे| महाराष्ट्रावर कोरोनाचं संकट दिवसेंदिवस अधिक गडद होताना दिसत आहे. राज्यात दररोज ६० हजारांच्या आसपास रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्बंधांचंही पालन नागरिकांकडून होत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मागच्या वर्षीसारखा लॉकडाउन लावण्याचा इशारा दिला आहे. त्यावरून माजी खासदार निलेश राणे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

अजित पवार यांच्या या विधानावरूनच निलेश राणे यांनी टीका केली आहे. “अजित पवार आपण रोज उठून लॉकडाउनची धमकी देता, पण पुण्याचे आपण पालकमंत्री आहात तिथे परिस्थिती सर्वात गंभीर आहे. पुण्यात कोण तुमचं ऐकत नाही आणि धमकी तुम्ही महाराष्ट्राला देता. नेतेगिरी कामात दाखवा साहेब, लोकांचे जीव वाचतील. लॉकडाउन हा फक्त एक पर्याय आहे, उपाय नाही,” अशी टीका निलेश राणेंनी केली आहे.

 

काय म्हणाले होते अजित पवार?

“पुणेकरांनी मागच्या आठवड्यात शनिवार, रविवारच्या लॉकडाउनला चांगला प्रतिसाद दिला होता. तेव्हा मी त्यांचं कौतुक केलं. आताही शनिवार, रविवार दोन दिवस पुणेकर हीच गोष्ट दाखवतील. एकंदरित मागच्यावेळी लॉकडाउन होतं तेव्हा आपण खूप मोठा काळ थांबलो. मात्र, दुसऱ्या लाटेत पहिल्या लाटेपेक्षा करोना बाधितांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कठोर वाटतील असे निर्णय घेण्याची वेळ आली. म्हणूनच नागरिकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी. माझ्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनीही सांगितलंय की दोन दिवसांचा लॉकडाउन पाळला नाही, तर मागच्या सारखा कडक लॉकडाउन आणावा लागेल, तशी वेळ येऊ नये अशी विनंती आहे,” असं अजित पवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साताऱ्यात ८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, ३२ जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल

News Desk

भारत सरकारने राज्यांना योग्य ‘ती’ आर्थिक मदत दिली पाहिजे, पवारांचे पंतप्रधानांना पत्र

News Desk

“…तर मुंबईत लॉकडाऊन करावाच लागेल”, पालकमंत्र्यांनी दिले संकेत

News Desk