HW News Marathi
Covid-19

लातूरमधील एकाच वसतीगृहात ४० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

लातूर | राज्यावर कोरोनाचे संकट पुन्हा एकदा ओढावले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. तर लातूर शहरात एकाच वसतीगृहात ४० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. लातूरमधील एमआयडीसी परिसरातील जेएसपीएम संस्थेच्या वसतीगृहात हा प्रकार घडला आहे. वसतीगृहातील ४० विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

लातूर महापालिकेने ४२० विद्यार्थ्यांची तपासणी केली होती. या तपासणीचे रिपोर्ट आता समोर आले असून ४० विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना १२ नं. पाटी येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अमरावती, यवतमाळ, पुणे, नागपूर, अकोला या ठिकाणी निर्बंध अधिक कठोर केले आहेत. तसेच, लोकांनी मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्स पाळणे या युचना वारंवार सरकारकडून देण्यात येत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार? मुख्यमंत्री म्हणतात…

News Desk

“मोदींना ना कोरोना आवरता येतोय ना सत्ता”, काँग्रेसची टीका

News Desk

राज्यात १ लाख २४५ गुन्ह्यांची नोंद, तर ३ कोटी ७६ लाख ५३ हजार ६९४ रुपयांचा दंड

News Desk