HW News Marathi
Covid-19

गरीबांचे पोट भरणाऱ्या शिवभोजन थाळीवर टीका करणाऱ्यांनी जरा वस्तुस्थिती पहा !

मुंबई | दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. अशाकाळात मजुर, कष्टकरी, निराधार, बेघर, गरीबांसाठी राज्यसरकारची शिवभोजन थाळी योजना आधार देणारी ठरत असल्याचे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान गुरुवारी (१४ एप्रिल) पहिल्याच दिवशी तब्बल ९६ हजार ३५२ शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले तर आज दुपारपर्यंत ९८ हजार ९८५ थाळ्यांचे मोफत वितरण करण्यात आले असल्याची माहितीही छगन भुजबळ यांनी दिली.

कोरोना प्रादुर्भावानंतर लॉकडाऊनच्या काळात मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या पॅकेजनुसार अन्न व नागरी पुरवठा विभागाने काल मोफत शिवभोजन थाळीचे वितरण करण्याचे आदेश निर्गमित केले त्यानंतर सर्वच केंद्रांनी कोरोनाचे सर्व नियम व राज्य सरकारने आखुन दिलेल्या नियमानुसार शिवभोजन थाळीचे मोफत वितरण केल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

शिवभोजन थाळी ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना !

शिवभोजन थाळी ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी अशी योजना आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली गतवर्षी देखील या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली होती.यावर्षी पुन्हा हे संकट ओढावल्यामुळे विभागाला अधिक जलद गतीने काम करण्याच्या सूचना मंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत.

गेले अनेक दिवस समाज माध्यमांवर शिवभोजन थाळीवर टीका केली जात आहे. मात्र गरीबांचे पोट भरणाऱ्या शिवभोजनवर टीका करणाऱ्यांनी जरा वस्तुस्थिती पहावी आणि मग समाज माध्यमात व्यक्त व्हावे असे मतदेखील छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या ‘आप’च्या मागणीला भाजपचे समर्थन

News Desk

कोरोनाकाळात लसी दुसऱ्या देशांना पाठवणं हे हत्याकांडच, मोदींनी माफी मागावी!

News Desk

मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी दिले लॉकडाऊनचे संकेत

News Desk