नवी दिल्ली | कॉंग्रेस पक्षात सध्या फार उलथापालथ होताना दिसत आहे. अध्यक्षपदाचा पदभार कोण घेणार, सोनिया गांधी राजीनामा देणार का असे अनेक प्रश्न उपस्थित होत असतानाच, राहूल गांधी यांनीही एक प्रश्न उपस्थित केला आहे. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या रुग्णालयात उपचार घेत असतानाच नेतृत्वावरुन पत्र का पाठवले असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना अजूनही वाटते की सोनिया गांधींनीच पक्षाचे नेतृत्व करावे तर काही नेत्यांना वाटते की पुन्हा राहूल गांधींनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारले पाहिजे. दरम्यान, याच मुद्द्यांवर आज कॉंग्रेस कार्यकारणीची बैठक होत आहे.
सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय?
देशभरातील काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षात मोठ्या बदलांची गरज असल्याचं मत त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष गरजेचा असल्याची महत्त्वाची मागणी २३ नेत्यांनी पत्रातून केली. यामध्ये काँग्रेस कार्यसमितीच्या अनेक सदस्यांसह, पाच माजी मुख्यमंत्री, खासदार आणि माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. पक्ष जनाधार आणि तरुणांचा विश्वास गमावत आहे. पक्षाला प्रभावी नेतृत्त्वाची गरज आहे. तो केवळ काम करताना दिसू नये, तर त्याचं काम प्रत्यक्ष जमिनीवर दिसायला हवं. सीडब्ल्यूसीची निवडणूक व्हायला हवी आणि पक्षाला पुन्हा उभारी घ्यावी यासाठी ठोस योजना तयार करायला हवी, असं २३ नेत्यांनी पत्रात म्हटलं आहे.
Rahul Gandhi says, why was the letter (over party leadership) sent at a time when Sonia Gandhi was admitted in the hospital: Sources https://t.co/AcndbGRNkm
— ANI (@ANI) August 24, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.