HW News Marathi
Covid-19

आवाजावरून कोरोना चाचणी करणे आता होणार शक्य !

मुंबई | राज्यासह मुंबईतही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनाविरुद्धध लढण्यासाठी गोरेगावमधील नेस्को जंबो सुविधा केंद्र येथे व्हॉईस बायोमार्कर्स उपलब्ध करून देण्यासाठी व्होकलिस हेल्थकेअर उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला. या यंत्रणेद्वारे व्यक्तिच्या किंवा संशयित रुग्णाच्या आवाजावरुन त्याची कोरोना चाचणी करणे शक्य होणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याचा प्रारंभ केला.

कल्पकता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे मुंबईमधील कोरोनाविरूद्धचा लढा अधिक बळकट करण्यासाठी आणि शहरातील कोविड रूग्णांकरीता त्वरित निदान आणि रिकवरी वाढविण्यासाठी मदत होणार आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित या तंत्रज्ञानाच्या आधारे कोरोनाचे निदान लवकर करणे शक्य होणार आहे. पण निदानासाठीच्या आरटी-पीसीआर चाचण्या मात्र सुरुच राहतील, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. आरोग्य क्षेत्रात विविध अत्याधुनिक तंत्राचा वापर केला जाईल, असे त्यांनी सांगितले. या नव्या तंत्रज्ञानामुळे नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Coronavirus : पुण्यात एका पोलिसांचा कोरोनाविरुद्ध लढताना मृत्यू

News Desk

पंढरपूरचे ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांना कोरोनाची लागण

swarit

उद्धव ठाकरेंनी यापुढे अयोध्येत येऊ नये, नाहीतर…!, विश्व हिंदू परिषदेचा इशारा

News Desk