HW News Marathi
Covid-19

‘मकरज’ची पुनरावृत्ती होणार? कुंभमेळ्यातून परतणाऱ्यांचा शोध सुरू

हरिद्वार | कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यातून परतणाऱ्या जिल्ह्यातील भाविकांचा शोध घेण्याचे काम वर्धा जिल्हा मुख्यालयामार्फत सुरू झाले आहे. पोलिसांनीही कुंभमेळ्यात गेलेल्या व्यक्तींबद्दल माहिती देण्याचे आवाहन नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून केले आहे. वर्षभरापूर्वी तबलिगींच्या ‘मरकज’मधून परतलेल्या नागरिकांची माहिती घेण्यासाठी प्रशासनाला जसा खटाटोप करावा लागला होता तशीच स्थिती आता निर्माण झाली आहे. कुंमेळ्यात अनेक रूग्ण सापडले असून देशाची चिंता वाढत आहे.

हरिद्वार येथे संपन्न झालेल्या कुंभमेळ्यासाठी मोठी गर्दी झाली. वर्धा जिल्ह्यातूनही काही भाविक हरिद्वार येथे गेले आहेत. आता ही मंडळी मेळा आटोपून परतीच्या वाटेवर आहेत. त्यांची निश्चित संख्या पुढे आलेली नाही. जिल्ह्यात दरदिवशी करोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यात आता नव्याने भर पडू नये म्हणून सर्व ती काळजी शासनातर्फे घेतली जात आहे. भाविकांनी जिल्ह्यात परत आल्यावर स्वत:च करोना तपासणी करावी, तसेच गृह विलगीकरणात राहून नियमांचे तंतोतंत पालन करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे म्हणाल्या, सध्या अशा भाविकांची निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही. त्याबाबत माहिती घेतली जात आहे. उत्तराखंडला काही वर्षांपूर्वी आलेल्या पुरात वर्धेतील काही वाहून गेले होते. तर काही सुखरूप परतले होते. त्या अनुषंगाने माहिती काढण्याचा प्रयत्न होत असल्याचे समजते. वर्षभरापूर्वी तबलिगींच्या दिल्ली मेळाव्यातून परतलेल्या नागरिकांची माहिती घेण्यासाठी प्रशासनाला बराच खटाटोप करावा लागला होता.

कोरोना संक्रमण उद्भवल्यानंतर तबलिगींचा शोध घेण्याचे मोठे आवाहन प्रशासनासमोर उभे झाले होते. मात्र शेवटी तबलिगींच्या स्थानिक प्रमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून याबाबत खुलासा केल्याने आवाहन संपुष्टात आले. आता कुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांना शोधून त्यांची तपासणी व गृह विलगीकरणात पाठवण्याचे नवे आव्हान जिल्हा प्रशासनसमोर आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या तब्येतीत बिघाड, नागपूरच्या रुग्णालयात केले दाखल

News Desk

कोरोनाशी लढण्यासाठी RBI च्या महत्त्वाच्या घोषणा ..

Arati More

राज्य सरकारकडून वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता 

News Desk