HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील कृषी खाते झोपले आहे का? बच्चू कडूंचा महाविकास आघाडीला सवाल

मुंबई | बोगस बियाणांमुळे हाताशी आलेले पीक गेल्याने शेतकरी चिंतेत आहे. सोयाबीनची शेती करणाऱ्यांना बोगस बियाण्यांचा मोठा फटका बसला आहे. त्यावरून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. राज्यातील कृषी खाते झोपले आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.काही दिवसांपूर्वीच बोगस बियाणांमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांवर पेरणीचे संकट ओढावले होते. यामधून शेतकरी सावरत होताच इतक्यात अमरावतीच्या चांदुर बाजार तालुक्यातील अनेक भागात सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाने धुमाकूळ घातला.या रोगामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.

मात्र, सरकार किंवा कृषी खात्याकडून त्यांची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. ही परिस्थिती पाहून बच्चू कडू यांनी कृषी खात्याला धारेवर धरले. राज्यातील कृषी खाते झोपले की काय अशी स्थिती निर्माण झाल्याचे बच्चू कडू म्हणाले. त्यामुळे आता कृषी खात्याकडून या समस्या दूर करण्यासाठी पावले उचलली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री बच्चू कडूंनी कृषी विभागाला लक्ष्य केले. ‘सोयाबीन पिकवणारा शेतकरी यंदा पूर्णपणे घायाळ करून टाकला आहे. पेरलं तेव्हा निघालं नाही आणि पीक हातात आलं तेव्हा मारून टाकलं. राज्यातलं कृषी खातं झोपलंय की काय अशी स्थिती आहे. जेव्हा बियाणांचं प्रमाणीकरण होतं, त्यावेळी काही बदमाशी होते का, असा प्रश्न मला पडतो. महाबीजनं बाजारातलं बियाणं घेतलं असा माझा स्पष्ट आरोप आहे. बाजारातून सर्वात निकृष्ट बियाणं २-३ हजार रुपये क्विंटल दरानं खरेदी करून ८ हजार रुपये क्विंटल दरानं विकलं,’ असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

कृषी विभागाच्या कारभाराबद्दल बच्च कडूंनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी बियाणे तयार करणाऱ्या कंपन्यांच्या मालकांना थेट इशारा दिला. ‘दरवर्षी अशीच स्थिती आहे. ५० वर्षांत परिस्थिती जराही बदलेली नाही. बियाणं चांगलं मिळालं, असं एक वर्षही जात नाही. या प्रकरणात जो आरोपी आहे, कंपनीचा मालक आहे, त्याला धरून चोपलं पाहिजे. त्याच्याशिवाय यात सुधारणा होणार नाही,’ अशी आक्रमक भूमिका कडू यांनी मांडली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द

News Desk

अजित पवारांनी उघडलेले कॉलेज उदय सामंत करणार बंद!

News Desk

महाराष्ट्राबद्दलच्या आकसातून मोदी सरकारने आणखी एक संस्था दिल्लीला हलवली! – सचिन सांवत

News Desk