HW News Marathi
Covid-19

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयातून महाराष्ट्राच्या जनतेला केले कळकळीचं आवाहन  

मुंबई | कोरोनाचा राज्यात शिरकाव झाल्यापासून राज्यभर पायाला भिंगरी बांधून दौरे करणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे सध्या स्वतः कोरोनाविरुद्ध लढाई देत आहेत. राजेश टोपे रुग्णालयात असतानाच महाराष्ट्रावर पुन्हा कोरोनाचं संकट घोंगावू लागलं आहे. मुंबई-पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये करोनाचा उद्रेक होताना दिसत असून, कोरोनाचा प्रसार झपाट्यानं होत असल्यानं राज्य सरकारकडून पुन्हा लॉकडाउन करण्याच्या विचारात आहे. मात्र, पुन्हा लॉकडाउनचं संकट ओढवून नये, यासाठी टोपे यांनी रुग्णालयातून महाराष्ट्राला कळकळीचं आवाहन केलं आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून राज्यभर फिरून आरोग्य सेवेचा आढावा घेणाऱ्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना मागील आठवड्यात करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर राजेश टोपे रुग्णालयात दाखल झाले होते. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असताना राज्यात करोनाचं संकट पुन्हा बळावलं आहे. दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत असून, आठ दिवसांत रुग्णसंख्या आटोक्यात न आल्यास लॉकडाउन लागू करण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच तसे संकेत दिले असून, पुन्हा एकदा लॉकडाउन लागू होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

“गेल्या वर्षभरापासून आपण कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहोत. शासनाची खंबीर भूमिका, ठोस उपाययोजना आणि प्रामाणिक प्रयत्न, जीवाची पर्वा न करता लढणारे अनेक कोरोना योद्धे, विशेषतः डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवक, पोलीस, स्वच्छता कामगार यांच्यामुळे आपण कोरोना नियंत्रित करू शकलो. मात्र, अद्यापही कोरोना गेलेला नाही. तो पुन्हा डोकं वर काढतोय. तेव्हा पुन्हा एकदा सामूहिक लढाई लढावी लागणार आहे. मी सध्या हॉस्पिटलमध्ये करोनाविरुद्ध लढतोय. गेल्या वर्षभरापासून विषाणू माझा पाठलाग करत होता. मी राज्यातील अनेक भागात गेलो. कोरोना हॉटस्पॉटला भेटी दिल्या. परंतु कोरोनाला माझ्याजवळ येणं जमलं नाही, पण अखेर त्याने मला गाठलेच. मात्र आपल्या सद्बावना, प्रेम यामुळे त्याला हरवून मी पुन्हा एकदा कोरोना विरुद्धच्या सामूहिक लढातईत सहभागी होणार आहे,” असं टोपे यांनी म्हटलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्राने राज्याला देण्यात येणार्‍या ऑक्सिजन कोट्यात कपात करून महाराष्ट्राला अडचणीत आणण्याचं काम करु नये

News Desk

पतंजलीच्या औषधाने कोरोना बरा होत नाही दिशाभूल केल्यास कारवाई करणार

News Desk

धक्कादायक ! बीडमध्ये कोरोना योद्ध्याला मिळाली नाही ॲम्बुलन्स, पॉझिटिव्ह असताना रात्रभर ड्युटी

News Desk