HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी आज संवाद साधत लॉकडाऊनची घोषणा करणार?

मुंबई | राज्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्याचीच घोषणा करण्यासाठी आज (१३ एप्रिल) मुख्यमंत्री रात्री जनतेशी संवाद साधणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरे आज रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधणार अशी चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रात आज-उद्या कधीही लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख काय म्हणाले?

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घोषणा करतील अशी माहिती दिली होती. “महाराष्ट्रात उद्या लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच निर्णय घेतील. इतकंच नाही तर लॉकडाऊनबाबत नियमावली आजच तयार होईल”, असं मुंबईचे पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री अस्लम शेख यांनी आज माध्यमांना सांगितलं होतं. त्यामुळे आज मुख्यमंत्री लॉकडाऊनची घोषणा करणार का? काय असेल नियमावली हे पाहणे महत्वाचे असणार आहे?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसे सर्वेक्षणातून समोर आली टक्केवारी, ७० टक्के लोकांना लॉकडाऊन पूर्णपणे संपावा वाटतो

News Desk

भाजपचे विधानसभेचे माजी आमदार योगेश टिळेकर कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

मजूरांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही – अरविंद केजरीवाल

News Desk