HW News Marathi
महाराष्ट्र

पार्थच्या ट्विटबद्दल मला काहीच माहीत नाही ! रोहित पवारांची प्रतिक्रिया

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येची चौकशी सुप्रीम कोर्टाने सीबीआयकडे सोपवला आहे. त्यामूळे महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांनी सहकार्य करावे, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. दरम्यान, सर्व स्तरांतून सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने तर महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. अशात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक नेते पार्थ पवार यांनी पक्ष विरोधी भूमिका घेत ‘सत्यमेव जयते!’ असे ट्विट केले आहे. त्यांच्या या प्रतिक्रीयेवर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पार्थ यांनी काय ट्विट केले हे मला माहित नाही. कोर्टात गेलेला हा विषय होता. यावर सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला आहे. त्यामूळे पुढे काय निर्णय घ्यायचा हा सरकारच्या विषय आहे. या ट्विटमध्ये त्यांनी काय लिहिले, का लिहिले हे मला माहित नाही. आज, उद्या आणि कायम मुंबई पोलिसांची आम्हाला अभिमान राहील. तसेच, कोणत्याही गोष्टींचा कुठलाही अर्थ काढता येतो, आपापल्या विचारांवर असतं. त्यामूळे मी इतकेच सांगेन की सुशांतला न्याय मिळाला पाहिजे आणि मुंबई पोलिसांची अभिमान आहे,”, असे रोहित पवार म्हणाले. दरम्यान, त्यांनी पार्थ यांच्या ट्विटवर कोणतीही थेट प्रतिक्रिया दिली नाही. आता यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवलीला पाटलांच्या किर्तनाला वारकऱ्यांचा विरोध; तिन्ही आयोजकांवर गुन्हा दाखल

News Desk

मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली

News Desk

नांदेडला समृद्धी महामार्गाशी जोडणार!, राज्य शासनाचा निर्णय

News Desk