HW News Marathi
Covid-19

देशात चिंताजनक स्थिती! २४ तासांत तब्बल १ लाख ५२ हजारांच्या पुढे आढळले कोरोना रुग्ण

नवी दिल्ली | देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता तर ही संख्या १ लाखाच्या पुढे जात आहे. देशात गेल्या २४ तासांत १,५२,८७९ जणांना कोरोनाची लागण झाल्याची समोर आलं आहे. दुसरीकडे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही वाढली असून, कालपर्यंत ८०० पर्यंत मर्यादित असलेली मृतांची संख्या ८००च्या पुढे गेली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रुग्णावाढ नोंदवण्यात आली आहे. देशात २४ तासांत १ लाख ५२ हजार ८७९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ९० हजार ५८४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. २४ तासांत ८३९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत १ लाख ६९ हजार २७५ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

महाराष्ट्रातील कोरोना स्थिती

राज्यात काल (१० एप्रिल) दिवसभरात ५५ हजार ४११ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर ३०९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.७२ टक्के इतका आहे. ५३ हजार ००५ रुग्ण करोनातून बरे देखील झाले. राज्यात आजपर्यंत एकूण २७,४८,१५३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट ८२.१८ टक्के इतका झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कामगाराला कोरोनाची लागण झाल्यास कारखाना मालकाविरुद्ध कारवाई नाही

News Desk

देशात कोरोना रुग्ण संख्येने ओलांडला ६० लाखांचा टप्पा

News Desk

१७ मेनंतर काय ? सोनिया गांधींचा सवाल

News Desk