HW News Marathi
Covid-19

लॉकडाऊनचे मुख्यमंत्र्यांचे संकेत मात्र भाजपचा विरोध

मुंबई | राज्यात कोरोनाची परिस्थिती प्रचंड गंभीर होत चालली आहे. दिवसाला महाराष्ट्रात ५० हजारांच्या पुढे रुग्ण संख्या आढळत आहे. याच पार्श्वभूमिवर राज्यात सध्या वीकेंड लॉकडाऊन सरकारने जारी केला आहे. आज (१० एप्रिल) या वीकेंड लॉकडाऊनचा पहिला दिवस आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. राज्यात लॉकडाऊन करायचा की नाही या मुद्यावर चर्चा सुरु आहे. इतकंच नाही तर राज्यात रेमडेसिव्हीरचा तुटवडा आहे, लसीचा तुटवडा आहे त्यावरही चर्चा सुरु आहे.

दरम्यान, राज्यात आला लॉकडाऊन लागू करण्याची वेळ आल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले आहेत. मात्र, भाजपने पुर्ण लॉकडाऊनला विरोध केला आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीत नेमका निर्णय काय होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तसेच, दुसरी महत्वाची बाब म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे आज या बैठकीला अनुपस्थितीत होते कारण लीलावती रुग्णालयात ते एडमिट झाले आहेत त्यांच्या हाताला काही दिवसांपूर्वी दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांच्या हाताची शस्त्रक्रिया होणार असल्याने ते रुग्णालयात दाखल झाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलेले १० मुद्दे :

  • निर्णय घेण्याची वेळ आली आहे, लॉकडाऊन हा एकमेव मार्ग नाही पण जगानेही तो स्वीकारला आहे.
  • लॉकडाऊन करायची वेळ आली आहे, कारण यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये.
  • महिन्याभराच्या आता आपण नियंत्रण आणू शकतो. पण एकमत व्हायला हवं. एक मुखाने निर्णय घेण्याची गरज आहे
  • लोकांचं येणे जाणे कमी करणे हा उद्देश आहे. कार्यालयाच्या वेळा बदला, घरातून काम करण्याचे नियोजन करा.
  • ‘पीक अवर’ ही संकल्पना आता बदलायला हवी.
  • निवडणूक आणि लग्न सराई सुरू झाली. यामुळे २५ वर्षावरील मुलं सुद्धा संक्रमित होत आहे.
  • ४५ वयावरील लोकांप्रमाणेच, आता २५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांनाही लस देण्याची केंद्राकडे विनंती.
  • रुग्ण संख्या नियंत्रणात आणायची असेल तर कोरोनाची साखळी तोडावी लागणार आहे. त्यासाठी लॉकडाऊन हाच पर्याय आहे.
  • राज्यातील रुग्ण, मृतांचा आकडा, औषधांचा उलब्ध साठा, लसीकरणाची माहिती आणि संसर्गाचा धोका, आदीबाबतचा आढावा
  • लॉकडाऊन लावल्यास महिन्याभराच्या आत आपण परिस्थिती नियंत्रणात आणू शकतो.
  • पण एकमत झाल्याशिवाय ते शक्य होणार नाही.
  • राज्यात संपूर्ण लॉकडाऊनसाठी होकार देण्याचं सर्व पक्षांना आवाहन
  • व्हॅक्सिनचा दुसरा डोस देऊनही लोक पॉझिटिव्ह होत आहेत. हा मुद्दा पंतप्रधानसमोर मांडला.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाशी लढण्यासाठी Twitter ने घेतला पुढाकार, 110 कोटींची केली मदत

News Desk

दिल्ली सरकार मद्यावरील ७० टक्के कोरोना शुल्क १० जूनपासून हटविणार

News Desk

महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीची चर्चा, शरद पवार दिल्लीला रवाना !

News Desk