HW News Marathi
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बारामतीसाठी रवाना

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांना फटकारल्यानंतर दुखावले गेलेले पार्थ पवार सध्या बारामतीत आहेत. तर अजित पवारही बारामतीत असून शरद पवार मुंबईहून बारामतीला रवाना झाले आहेत. त्यामुळे आज (१६ ऑगस्ट) पार्थच्या नाराजीबाबत कुटुंबियांमध्ये चर्चा होणार का ? याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान पार्थ पवार गेल्या दोन दिवसांपासून आपल्या नातेवाईकांच्या भेटीगाठी घेत आहेत..

काल (१५ ऑगस्ट) बारामतीत काका श्रीनिवास पवार यांच्याशी चर्चा केली. श्रीनिवास पवार यांच्याशी चर्चा करून पार्थ बारामतीतच थांबले आहेत.आज शरद पवार बारामतीत जात असल्याने कुटुंबात चर्चा होणार का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. दरम्यान पार्थ पवार आणि अजित पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. 

काय म्हणाले होते शरद पवार?

पार्थ पवार अपरिपक्व. माझ्या नातवाच्या मागणीला कवडीची किंमत नाही”, असे म्हणत शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे दिसून येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे गेल्या काही दिवसांत राज्यातील महाविकासआघाडी सरकार आणि शरद पवारांविरोधात अशी एक वेगळी भूमिका घेताना दिसून आले. राजकीय वर्तुळात याच पार्श्वभूमीवर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. त्यानंतर आता खुद्द शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिंदे-ठाकरे गटामध्ये झालेल्या ‘त्या’ राड्यात सरवणकरांच्या बंदुकीतून गोळी सुटली; अहवालातून स्पष्ट

Aprna

‘मुख्यमंत्री हजर नसताना तुम्ही कसले भूमीपूजन करत होतात ?’

Gauri Tilekar

पुलवामा हल्ल्याबाबत यादव यांचे वक्तव्य हे गलिच्छ राजकारणाचे उदाहरण !

News Desk