HW News Marathi
Covid-19

प्लाझ्मा दान करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागरिकांना आवाहन

पुणे | कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा (रक्तद्रव) उपचार पद्धती यशस्वी ठरत असल्याने अधिकाधिक व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले आहे.प्लाझ्मा दाते आणि प्लाझ्मा स्वीकृते यांच्या मध्ये समन्वय यासाठी मितेश घट्टे, पोलिस उपायुक्त, विशेष शाखा प्रयत्न करत आहे. यासाठी https://puneplasma.in हे ॲप विकसित करण्यात आले आहे. शासकीय निर्णय आणि कायदेशीर बाबी लक्षात घेऊन यामध्ये समन्वय साधला जात आहे. ॲपवर प्लाझ्मा दान करण्यासाठी ३३ जणांनी इच्छा प्रदर्शित करून नोंदणी केली आहे तर ६१ जणांनी प्लाझ्माची मागणी केली आहे.

पुणे भागासाठी अँटिजेन किट घेण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश देत ५० हजार अँटिजेन किट घेण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच ‘कोरोना’ रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक रुग्णालयांचा या योजनेत समावेश करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

महत्वाचे मुद्दे –

– ५० हजार अँटीजेन किट घेण्याची कार्यवाही तात्काळ करा.

– अधिकाधिक रुग्णालयात ‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’चा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यवाही करा.

– ग्रामीण भागातील कोरोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करा.

– अधिक रुग्णसंख्या असणाऱ्या भागावर लक्ष केंद्रित करा.

– अवाजवी शुल्क आकारणी करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा.

– गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी जनजागृती करावी.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यातील ससून रुग्णालयात पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी

News Desk

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण; अधिवेशनातील आमदार, मंत्र्यांना धोका

Aprna

राज्यात १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस द्या! । नाना पटोले

News Desk