HW News Marathi
Covid-19

राज्यात आज कोरोनामुक्त रुग्णांची संख्या बाधितांपेक्षा जास्त

मुंबई |राज्यात आज (१२ ऑगस्ट) नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. गेल्या २४ तासांमध्ये १३,४०८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या आता ३ लाख ८१ हजार ८४३ इतकी झाली आहे.

राज्यात १२ हजार ७१२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. राज्यातील एकूण संख्या ५ लाख ४८ हजार ३१३ वर पोहोचली आहे. राज्यात सध्या १ लाख ४७ हजार ५१३ अॅक्टिव्ह केसेस आहे.

तर दुसरीकडे राज्यात चोवीस तासांमध्ये ३४४ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात १८ हजार ६५० मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील रूग्ण बरे होण्याचा दरही वाढला असून तो आता ६९.६४ टक्क्यांवर पोहोचला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कपिल आणि धीरज वाधवान सीबीआयच्या ताब्यात, अनिल देशमुख यांची ट्वीटद्वारे माहिती

News Desk

“मी सारखा झोपेतून उठून बघतो, पडलं का काय सरकार?”

News Desk

जाणून घ्या…सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याने दंड भरलेले ‘ते’ पंतप्रधान कोण?

News Desk