HW News Marathi
देश / विदेश

सर्वोच्च न्यायालयात सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी सुनावणी पूर्ण, निर्णय ठेवला राखून 

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयात आज (११ ऑगस्ट) बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली आहे. दरम्यान, सर्व पक्षांचे युक्तिवाद एकूण घेतल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. त्याचप्रमाणे, सर्व पक्षांच्या वकिलांनी आपला युक्तिवाद संक्षिप्त स्वरूपात लेखी द्याव्या अशा सूचना देखील सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आल्या आहेत.

सुशांतच्या गळ्यावरील खुणा या बेल्टच्या होत्या !

सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह म्हणतात की, “सुशांतला त्याच्या कुटुंबियांपासून दूर केले जात होते. सुशांतच्या वडिलांनी वारंवार चौकशी केली होती की सुशांतवर कोणते उपचार सुरु आहेत. मला तिथे येऊ द्या. मात्र, त्यांना कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. या प्रकरणात अनेक बाबींचा तपास करणे अत्यंत आवश्यक आहे. सुशांतच्या गळ्यावरील खुणा या बेल्टच्या होत्या. त्याचप्रमाणे सुशांतच्या पंख्याला लटकलेला मृतदेह कोणीही पाहिलेला नाही”.

“समोरच्या बाजूकडून मीडिया रिपोर्ट्सनुसार युक्तिवाद केला जात आहे. मात्र, आम्ही तसे होऊ देणार नाही. त्याचप्रमाणे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या मुलालाचाही सहभाग असल्याचे मीडियामधून सांगण्यात येत आहे. मात्र, त्यावर मला काहीच बोलायचे नाही”, असे सुशांतच्या वडिलांच्या वकिलानी म्हटले आहे.

मुंबई पोलिस जे करत आहेत ते योग्य नाही !

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी बोलताना सरकारी वकील तुषार मेहता म्हणतात, “CrPC 174 अंतर्गत सुरू झालेल्या घटनेच्या मृत्यूची चौकशी अगदी थोड्या काळासाठी सुरु राहते. अशा प्रकरणात मृतदेहाकडे पाहून आणि घटनास्थळी जाऊन मृत्यूचे कारण संशयास्पद आहे अथवा नाही हे पाहिले जाते. त्यानंतर FIR नोंदवला जातो. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस जे करत आहेत ते योग्य नाही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

६ डिसेंबरला बाबरी मशीद जादूने पाडण्यात आली होती का? ओवीसींची संतप्त प्रतिक्रिया

News Desk

राजस्थानच्या शालेय पाठ्यपुस्तकात सावरकरांवरील अभ्यासक्रम वगळला

News Desk

दरमाह तब्बल चार लाखांची पोटगी देण्याचे आदेश

News Desk