HW News Marathi
Covid-19

प्रसिद्ध गझलकार, शायर राहत इंदौरी यांची कोरोनामुळे प्राणज्योत मालवली

भोपाळ | लोकप्रिय गझलकार, शायर राहत इंदौरी यांचे निधन झाले. आजच (११ ऑगस्ट) त्यांच्या कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. राहत इंदौरींची ७०व्या वर्षी प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

गझलकार आणि कवी-गीतकार राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करत दिली होती. राहत इंदौरी यांना इंदौरच्या अरविंदो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. राहत इंदौरी यांची प्रकृती स्थिर असून धोक्याच्या बाहेर आहे, अशी माहिती त्यांच्या मुलाने दिली होती.

“कोविडची प्राथमिक लक्षणे दिसू लागताच माझी कोरोना चाचणी करण्यात आली. तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मी अरविंदो हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट आहे. या आजाराचा मी लवकरात लवकर पराभव करावा, अशी प्रार्थना करा. आणखी एक विनंती आहे, मला किंवा माझ्या कुटुंबीयांना फोन करु नका, आपणास माझ्या प्रकृतीची माहिती ट्विटर आणि फेसबुकवर मिळेल.” असे ट्वीट त्यांनी केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेल्वेकडून ३० जूनपर्यंत सर्व बुकिंग रद्द, विशेष आणि श्रमिक रेल्वे धावणार

News Desk

समाजालाही वाटलं पाहिजे ना तुम्ही राजे आहात ! नारायण राणेंचा संभाजीराजेंवर घणाघात

News Desk

जयंत पाटलांचे सुपुत्र प्रतिक पाटील यांनाही कोरोनाची लागण

News Desk