HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसलेंच्या कार्यालयावर ईडीची धाड

पुणे | राज्यात सध्या ईडीच्या धाडी पडण्याचे सत्र सुरुच आहे. पुण्यातील बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीकडून धाड टाकण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी केली जात होती. सहा वर्षांपूर्वींच्या विदेशी चलन प्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अविनाश भोसले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम तसंच हॉटेल व्यवसायिक आहेत.

ईडीचे अधिकारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अविनाश भोसले यांच्या एबीआयएल कार्यालयात पोहोचले. ईडीकडून अविनाश भोसले यांची चौकशी सुरु आहे. अविनाश भोसले यांची याआधी नोव्हेंबर महिन्यात ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. तसंच आयकर विभागाकडून अविनाश भोसले यांच्या पुणे आणि मुंबईतील २३ ठिकाणांवर धाड टाकण्यात आली होती अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान, अविनाश भोसले यांची कन्या स्वप्नालीचा विवाह दिवंगत काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे चिरंजीव आणि काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्याशी विवाह झाला आहे. ईडीने याप्रकरणी त्यांनाही दोन आठवड्यांपूर्वी नोटीस पाठवली असल्याचं वृत्त होतं. विश्वजीत कदम यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सनी लिओनला ‘बोल्ड’ प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला लातूरमध्ये धक्काबुक्की

News Desk

“24 तासातले दोन तास मला उचक्या लागतात”, नाव न घेता धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना टोला

News Desk

देशाच्या बळीराजाला न्याय मिळावा हीच राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त सदिच्छा, पवारांचे भावनिक ट्विट

News Desk