मॉस्को | जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूशी दोन हात करण्यासाठी संपूर्ण जगतील शास्त्रज्ञ लस शोधत आहेत. काही देशांवर त्या तयार केल्या असून त्याची क्लिनिकल ट्रायल देखील सुरु केली आहे. दरम्यान, जगभरातून सुरु असलेल्या या लस तयार करण्याच्या यादीत रशियाने बाजी मारली आहे. कोविड-१९ वरील लस शोधणारा रशिया हा जगतातील पहिला देश ठरला आहे. या संबंधी माहिती रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिली आहे.
#BREAKING Russia has developed 'first' coronavirus vaccine: Putin pic.twitter.com/s33LTMO0j0
— AFP News Agency (@AFP) August 11, 2020
कोरनावरील ही लस गॅमलेया संशोधन संस्था आणि रशियन संरक्षण मंत्रालयाने संयुक्तपणे विकसित केली आहे. या लसीच्या वैद्यिक चाचण्या १८ जूनला सुरु करण्यात आल्या होत्या. या चाचणीत ज्या ३८ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता त्यांच्या रोगप्रतिकारशक्ती विकसित झाल्याने समोर आले होते. दरम्यान पुतीन यांच्या मुलीने देखील ही लस घेतल्याची माहिती मिळत आहे. तसेच, ‘ही लस प्रभावी ठरते आणि स्थिर प्रतिकार शक्ती निर्माण करते’, असा दावाही पुतीन यांनी केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.