HW News Marathi
महाराष्ट्र

#SushantSinghRajput : मुंबई पोलिसांचा तपास CBI कडे जाणार का, आज होणार सुनावणी

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास CBI कडे जाणार का यावर आज(११ ऑगस्ट) सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलीस करत असलेला तपास CBI कडे सोपवला जाण्याची शक्यता आहे. हा तपास मुंबई पोलिसांकडे रहावा यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे.भाजप मात्र वारंवार हा तपास CBI कडे सोपवला जावा अशी मागणी करत आहे.

बिहार सरकारच्या विनंतीनंतर केंद्र सरकारने हा तपास CBI कडे सोपवला आहे. महाराष्ट्र सरकार मागणी करत आहे की, सीबीआच्या वतीने दाखल करण्यात आलेला गुन्हा मुंबई पोलिसांकडे देण्यात यावा. सुप्रीम कोर्टाने मागच्या सुनावणीत मुंबई पोलिसांकडे सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी आतापर्यंत करण्यात आलेल्या सुनावणीचा रिपोर्ट मागितला होता. तो पाहिल्यानंतर आणि सर्वांचं म्हणणं ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्टात याप्रकरणी तपास कोण करणार, याविषयी आज निर्णय होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांबाबत महाविकास आघाडीची भूमिका दुटप्पी – फडणवीस 

News Desk

गीता वाटण्याऐवजी निकाल वेळेवर लावा | उद्धव ठाकरे

News Desk

#MahalaxmiExpress : ५०० प्रवाशांना एनडीआरएफने वाचविले

News Desk