HW News Marathi
Covid-19

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या तब्येतीत बिघाड, नागपूरच्या रुग्णालयात केले दाखल

अमरावती | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याचे वृत्त समोर येत आहे. नुकताच त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.या दरम्यान सुरु असलेल्या उपचारावेळी त्यांची तब्येत बिघडली असल्याने त्यांना नागपूरच्या वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यासह कुटुंबातील १० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे सर्वांवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान नवनीत राणा यांची तब्बेत बिघडल्याची माहिती आहे.

नवनीत राणा यांच्यासह पती आणि आमदार रवी राणा, दोन्ही मुले, सासू-सासरे असे कुटुंबातील १२ जण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. जवळपास सहा दिवसांपूर्वी नवनीत राणा यांचा अहवाला कोरोना पॉझिटिव्ह आला होता. नवनीत राणा यांच्या सासू-सासऱ्यांवर नागपूरच्या वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये आधीपासूनच उपचार सुरु आहेत.

आमदार रवी राणा यांचे वडील, म्हणजेच नवनीत कौर राणा यांचे सासरे यांचा कोरोना रिपोर्ट २ ऑगस्टला पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर कुटुंबातील इतर सदस्य, कार्यकर्ते अशा जवळपास ५० ते ६० जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धारावी कोरोना मॉडेलचं जगभरात कौतुक, फिलिपिन्समध्ये धारावी मॉडेल राबवणार

News Desk

#Coronavirus : मालेगावात आता संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्यात येणार

News Desk

उद्धव ठाकरेच Best CM! कोरोनाची दुसरी लाट प्रभावीपणे हाताळणारे मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती

News Desk