HW News Marathi
महाराष्ट्र

विनायक राऊत म्हणजे मातोश्रीवरचा चप्पलचोर आणि ‘थापे’बाज, निलेश राणेंचा प्रहार

मुंबई | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कोकण दौऱ्यानंतर भाजपला प्रत्युत्तर देण्यात आघाडीवर असलेले शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर निलेश राणे यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली आहे. विनायक राऊत म्हणजे मातोश्रीवरचा चप्पलचोर आणि ‘थापे’बाज आहे, अशी बोचरी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या हट्टामुळे शिवसेना-भाजपची युती तुटली. तसेच अमित शाह हे विश्वासघातकी व्यक्ती आहेत, असे विनायक राऊत यांनी म्हटले होते. या टीकेला आता निलेश राणे यांनी एक व्हिडीओ ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे. या व्हिडीओत निलेश राणे यांनी विनायक राऊत यांचा अक्षरश: शेलक्या शब्दांत उद्धार केला आहे.

विनायक राऊत ही खासदारपदाच्या लायकीची व्यक्ती नाही. संसदेत काय बोलायचे हे देखील त्यांना कळत नाही. केवळ लाट होती म्हणून ते कोकणातून निवडून आले. त्यांच्यात हिंमत असेल तर या क्षणाला खासदाराकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवून दाखवावी. मग त्यांना किती मतं पडतात, हे पाहूच. विनायक राऊत यांच्यात तेवढी हिंमतही नाही. पण २०२४च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांचा बंदोबस्त करुन राऊतांना कोकणातून हद्दपार करू, अशी गर्जना निलेश राणे यांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वीच जिल्हा नियोजन बैठकीत विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यात खडाजंगी झाली होती. त्यानंतरही विनायक राऊत सातत्याने राणे यांच्या टीकेला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देत होते. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी विनायक राऊत यांना इशारा दिला. तुम्ही भाषा बदलली नाहीत तर जिथे दिसाल तिथे फटकावीन, असा इशाराही निलेश राणे यांनी दिला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोटनिवडणूकीवरुन राजकारण तापलं, पोटनिवडणुकीविरोधात न्यायालयात जाण्याची पंकजा मुंडेंची भूमिका

News Desk

…असं असेल तर आम्ही रोज पंतप्रधानांचा राजीनामा मागू!

News Desk

दिल्ली येथील आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक

News Desk