HW News Marathi
Covid-19

खुशखबर! मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंंट रात्री १ पर्यंत सुरू राहणार

मुंबई | मुंबईमधील हॉटेल, रेस्टॉरंंट, मद्यालये, फूड कोर्ट सकाळी ७ ते रात्री १ या वेळेत खुली ठेवण्यास मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे. त्याचबरोबर दुकाने सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत, तर मद्यविक्रीची दुकाने (वाईन शॉप) सकाळी १० ते रात्री १०.३० या काळात सुरू ठेवता येणार आहेत. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी याबाबत परिपत्रक जारी केले आहे.

एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य सरकारने २९ जानेवारी २०२१ रोजी दुकाने आणि उपाहारगृहांच्या वेळा निश्चित केल्या. राज्य सरकारच्या या आदेशांचा आधार घेत इक्बालसिंह चहल यांनी बुधवारी परिपत्रक जारी करून मुंबईतील हॉटेल्स, रेस्तरॉ, मद्यालये, फूड कोर्ट सकाळी ७ ते रात्री १ या कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.

त्याचबरोबर सकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत दुकाने, तर सकाळी १० ते रात्री १०.३० या काळात मद्यविक्रीची दुकाने खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी हॉटेल, रेस्तराँ आदी रात्री ११ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी होती. परिणामी, आता मुंबई हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रशियात कोरोना विरुद्धची लस तयार, मानवी चाचणी यशस्वी झाल्याचा दावा !

News Desk

देशात गेल्या २४ तासांत ३८,१६४ नवे कोरोना रुग्ण

News Desk

साताऱ्यात शिवेंद्रराजेंनी घेतली शरद पवार अन् अजित पवारांची भेट

News Desk