HW News Marathi
Covid-19

नांदेडमध्ये चिखलीकर पिता-पुत्र कोरोना पॉझिटिव्ह

नांदेड | आमदार, खासदार यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. याआधी त्यांचा मुलगा नांदेड जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांना कोरोना झाला होता.

मार्च महिन्यापासूनच चिखलीकर पिता-पुत्र दोघेही सातत्याने मतदारांच्या संपर्कात आहेत. त्यातून त्यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले. चिखलीकर यांच्या संपर्कात आलेल्या अन्य सात जणांची चाचणीही पॉझिटिव्ह आली असून त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत.

नांदेडमध्ये लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. याआधी काँग्रेसच्या चार आमदारांना कोरोनाची लागण झाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात चिंताजनक स्थिती! २४ तासांत तब्बल १ लाख ५२ हजारांच्या पुढे आढळले कोरोना रुग्ण

News Desk

राज्यात ५,९६५ नवे रुग्ण आढळले

News Desk

महाराष्ट्रात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम राहणार? आदित्य ठाकरे म्हणतात…

News Desk