HW News Marathi
महाराष्ट्र

अवघ्या २४ तासांत ‘मनसे’ने नेमला डोंबिवलीचा नवा शहराध्यक्ष! 

डोंबिवली | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाबालेकिल्ला समजलेल्या जाणाऱ्या डोंबिवलीत अचानक दोन मोठ्या नेत्यांनी साथ सोडल्यामुळे पडझड झाली. त्यामुळे थेट अध्यक्ष राज ठाकरे यांनी तातडीने हस्तक्षेप करून डॅमेज कंट्रोल केले आहे. मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी सोमवारी रात्री पक्षाला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ आज (२ फेब्रुवारी) सकाळी माजी विरोधीपक्षनेते, गटनेते मंदार हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या घडामोडीनंतर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी कृष्णकुंजकडे धाव घेतली. राज ठाकरे यांच्याची चर्चा केल्यानंतर तातडीने यावर तोडगा काढण्यात आला.

दरम्यान, रिक्त झालेल्या डोंबिवली शहर अध्यक्षपदी माजी नगरसेवक मनोज घरत यांची निवड करण्यात आली आहे. याआधीही त्यांनी शहराध्यक्षपद भूषवले होते. अचानक पडलेल्या खिंडारामुळे थेट याची झळ कृष्णकुंजपर्यंत पोहोचली. त्यामुळे अवघ्या २४ तासांत जुन्या शिलेदाराला नवी जबाबदारी देऊन राज ठाकरे यांनी डोंबिवलीत डॅमेज कंट्रोल केले. एका वर्षभरासाठी ही निवड करण्यात आली आहे. त्यामुळे मनसे आणखी नवी कोणती स्ट्रेटेजी आखणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिक पोलिसांचा गौरव, रणजित पाटील यांनी केले आयुक्तांचे अभिनंदन

News Desk

बडबड करणा-या लोकांना उत्तर देण्याची गरज नाही, रामदेवबाबांचा दिग्विजय यांना टोला

News Desk

“… तर तुझ्या डोक्यात ६ गोळ्या घालेन”, धनंजय मुंडे प्रकरणाने राजकारण पेटलं 

News Desk