मुंबई | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सन 2021-22 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले. केंद्रीय अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या असून विरोधकांनी मात्र या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे. तर, भाजप नेत्यांनी मात्र या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील या अर्थसंकल्पावर भाष्य केलं आहे. देशाच्या मागील १०० वर्षांत असं बजेट सादर झालेलं नाही, असं म्हणत त्यांनी निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत.
‘भारताच्या मागील १०० वर्षांत असं अर्थसंकल्प सादर झालेलं नाही. हे अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार. वाढीव कर लावल्याशिवाय देशाच्या प्रगतीस चालना कशी दिली जाऊ शकते हे आता जगातील सर्व देश बघतील आणि शिकतील ,’ असं कौतुक देखील अमृतीत फडणवीस यांनी केलं आह. दरम्यान, नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद करण्यात आल्याची घोषणा सीतारामन यांनी केल्यानंतर फडणवीस ट्विटरच्या माध्यमातून नाशिककर व नागपूरकरांचं अभिनंदन केलं आहे.
मात्र, अमृता फडणवीस या ट्विटमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाल्या आहेत. त्यांच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अमृता फडणवीस यांच्या या ट्विटनंतर त्यांना चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. ‘स्वातंत्र्याला १५० वर्षे तरी पूर्ण झाली आहेत का?, देशाला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षे झालीत आणि गेल्या १०० वर्षांच्या बजेट विषयी बोलताय’,असे प्रश्न विचारत अमृत फडणवीसांवर ट्रोलर्सनी चांगलाच निशाणा साधला आहे. अमृता फडणवीस या सतत चर्चेत असतात.
आपण नक्की भारतीय आहात का..? आपल्या ह्या विधानावरून हा प्रश्न उपस्तीत होतो.. भारत स्वतंत्र होऊन ७३ वर्ष झाली आणि ह्यांनी १०० वर्षांतील कोणते बजेट पाहिले आहेत..
ह्यांनी जनतेला पागल बनवायचा धंदा सुरू केला आहे वाट..
न्हवरा जनतेला गाजर दाखवतो आणि ही बाई जनतेला जोक्स सांगते..🤣😂🤣— Anuj Eknath Gaikwad (अनुज अर्चना एकनाथ गायकवाड) (@AnujGaikwad10) February 1, 2021
मामी आपला देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले नाहीत..
आणि तुम्ही म्हणताय 100 वार्षातल चांगला बजेट आहे..
नेमक चुकतंय कोण…??
कदाचित आम्हालाच चुकीचा इतिहास शिकवला असेल..
तुमचं बरोबर आहे मामी..
बजेट वरती एखाद गाणं येऊद्या..— samadhan jagtap (@jsam2212) February 1, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.