HW News Marathi
Covid-19

खुशखबर ! ॲाक्सफर्ड लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ट्रायलसाठी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटला मिळाली परवानगी !

मुंबई | कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चिंता वाढत चालली आहे. मात्र, जगभरात यावर लस शोधण्याचे काम सुरू आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ तयार करत असलेल्या लसीची दुसरी आणि तिसरी मानवी चाचणी आता पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये होणार आहे. त्याची परवानगी डीसीजीआय यांनी सिरम इन्स्टिट्यूट यांना दिली आहे.

याची चाचणी लवकरच पुण्यात सुरू होणार आहे. यासाठी वोलेनटियर नेमले आहेत. त्यांना लसीचा पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस २९ दिवसांनी देण्यात येणार आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची पहिली चाचणी झाल्यानंतर २ आणि ३ री चाचणी करण्याची परवानगी याआधी मागण्यात आली होती. मात्र, काल रात्री उशिरा ही परवानगी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट यांना देण्यात आली आहे. या क्लिनिकल ट्रायलमध्ये १८ वर्षांवरील १६०० लोकांना ही लस देण्यात येणार आहे. यात १७ ठिकाणी ही चाचणी करण्यात येणार आहे.

सध्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या या लसीची दुसरी आणि तिसरी क्लिनिकल ट्रायल युकेमध्ये सुरू आहे.तिसरी क्लिनिकल ट्रायल ब्राझिल आणि पहिली आणि दुसरी क्लिनिकल ट्रायल साऊथ आफ्रिकामध्ये सुरू आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकीय ईर्षेपोटी राज्यकर्त्यांनी देशाचे स्मशान केले ! शिवसेनेचा घणाघात

News Desk

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण

News Desk

संचारबंदीत अडकलेल्या राज्यातील सर्व लोकांना एसटीने मोफत घरी सोडणार

News Desk