नवी दिल्ली | आज (१ फेब्रुवारी) दशकातील पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात येत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आपला सलग तिसरा अर्थसंकल्प मांडत आहेत. कोरोना काळात मंदीचं सावट आलेल्या अर्थसंकल्पाला त्यानिमित्ताने ‘आर्थिक लस’ देण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं करण्यात येईल.
देशाच्या अर्थसंकल्पाकडून सामान्य व्यक्तीपासून ते उद्योगपतींना मोठ्या अपेक्षा असतात. प्रत्येक क्षेत्राला अर्थसंकल्पाकडून काही मदतीच्या अपेक्षा असतात. अर्थसंकल्पाच्या निमित्ताने आज विविध क्षेत्रांसाठी घोषणा करण्यात येतील. त्यानिमित्ताने सरकारच्या तिजोरीत उत्पन्न कोणकोणत्या मार्गाने येते आणि ते उत्पन्न नंतर कोणत्या गोष्टींवर खर्च केले जाते याचं गणित मांडण्यात येईल.
निर्मला सीतारामण यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे –
एमएसपीमध्ये महत्वाचे बदल करण्यात येणार
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.
२०२०-२१ मध्ये शेतकऱ्यांना ७५,०६० कोटी रुपये गव्हासाठी देण्यात आले.
अर्थमंत्र्यांकडून २०१३-१४ च्या आकड्यांसोबत तुलना
२०२०-२१ मधील खरेदी सुरु
केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर धान्य खरेदी
ईनाममधून पारदर्शकतेला प्राधान्य
ईनाममध्ये १.६८ कोटी कंपन्यांची नोंदणी
ईनाममधून पारदर्शकतेला प्राधान्य
एपीएमसीमधील सोयी सुविधा वाढवण्यासाठी निधीची तरतूद
सरकार शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट एमएसपी देणार,
२०१३-१४ मध्ये गहू उत्पादक शेतकऱ्यांना ३३,८७४ कोटी,२०१९ मध्ये ५२,८०२ कोटी, २०२१ मध्ये ७५,०६० कोटींची तरतूद
शेतकऱ्यांना पिकाच्या उत्पादन खर्चाच्या दिडपट म्हणजेच १.५ पट किमान आधारभूत किंमत दिली जाणार
Our Govt is committed to the welfare of farmers. The MSP regime has undergone a change to assure price that is at least 1.5 times the cost of production across all commodities: Finance Minister Nirmala Sitharaman #UnionBudget pic.twitter.com/WL93H0M4xL
— ANI (@ANI) February 1, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.