HW News Marathi
महाराष्ट्र

प्रसिध्द गझलकार इलाही जमादार यांचे निधन

मुंबई | विख्यात गझलकार इलाही जमादार यांचं वृद्धापकाळानं निधन झालं आहे. सांगलीजवळच्या दूधगावात वृद्धापकाळाने निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इलाही जमादार आजाराने त्रस्त होते. त्याच्या जाण्याने गझल विश्वात शोककळा पसरली आहे.

मराठी विश्वातील प्रसिद्ध गझलकार अशी इलाही जमादार यांची ओळख होती. इलाही जमादार यांचा जन्म १ मार्च १९४६ साली सांगतीलीत दुधगावात झाला. लोकप्रिय दिग्गज गझलकार सुरेश भटांच्या नंतर इलाही जमादार यांच्या नावाचा उल्लेख होत असे. इलाही जमादार यांनी १९६४ सालापासून काव्यलेखनाला प्रारंभ केला.

ते आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी म्हणून इलाही जमादार यांची विशेष ओळख होती. विविध मराठी, हिंदी, उर्दू दैनिक आणि मासिकांतून इलाहींच्या कविता आणि गझला प्रसिद्ध झाल्या आहेत. ते गझल क्लिनिक ही नवोदित मराठी कवींसाठी गझल कार्यशाळा घ्यायचे. वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं आहे.

इलाही जमादार यांनी अनेक कविसंमेलने आणि मुशायरे यात भाग घेतला आहे. इलाही जमादार यांचे महाराष्ट्रतील अनेक शहरांत आणि महाराष्ट्राबाहेरील इंदूरमध्ये स्वतंत्र काव्यवाचनाचे आणि मराठी गझलांच्या संदर्भातील प्रश्नोत्तरांचे जाहीर कार्यक्रम होत असत. इलाही यांनी ‘जखमा अशा सुगंधी’ आणि ‘महफिल-ए-इलाही’ या नावांनी मराठी, उर्दू काव्यवाचनाचे जाहीर कर्यक्रम केले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोकणातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Aprna

पोलिसांच्या साडेसात हजार पदांसाठी लवकरच भरती! – मुख्यमंत्री

Aprna

नारायण राणेंकडून नव्या राजकीय पक्षाची घोषणा

News Desk