HW News Marathi
महाराष्ट्र

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देणार नाही !

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सोमवारी (२७ जुलै) गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. यावेळी पार्थ पवार यांनी बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती. मात्र, अनिल देशमुख यांनी पार्थ पवार यांची ही मागणी पूर्णपणे फेटाळून लावली आहे. “सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची तपासणी आम्ही सीबीआयकडे देणार नाही. या प्रकरणाचा तपास करण्यास महाराष्ट्र पोलीस पूर्णपणे सक्षम आहे”, असे यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

“सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी होत होती. मात्र, त्यासाठी महाराष्ट्र पोलीस पूर्णपणे सक्षम आहे. त्यामुळे या प्रकारची चौकशी सीबीआयकडे देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही”, असे गृहमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. दरम्यान, “अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी ही संपूर्ण देश आणि विशेषत: देशातील तरुणांची भावना आहे. त्यामुळे मी गृहमंत्र्यांना अशी विनंती केली आहे कि, ही राष्ट्रीय भावना विचारात घेऊन या प्रकारची सीबीआय चौकशी सुरु करावी”, अशी माहिती पार्थ पवार यांनी स्वतःच्या ट्विटरच्या माध्यमातून दिली होती.

https://www.facebook.com/hwnewsmarathi/posts/1006149609818502

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘न्यायालयीन चौकशी पूर्ण झाल्याशिवाय मी चौकशीला जाणार नाही’, अनिल देशमुखांची भूमिका!

News Desk

“ये है उद्धव का ‘नया’ महाराष्ट्र” !!, नितेश राणेंची सरकारवर टीका

News Desk

राष्ट्रवादीशी जवळीक वाढल्याचा विषय नाही, मी भाजपशी प्रामाणिक –  संजय काका पाटील  

News Desk