HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या जन्मदिनी भाजपाकडून अपशकुन,हसन मुश्रीफांचा आरोप !

मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज ६० वा वाढदिवस,यानिमित्ताने देशभरातून त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या. दुसरीकडे आज भाजप कार्यकारणीच्या बैठकीत भाषण करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ठाकरेंवर आणि सरकारवर टिका केली,ही गोष्ट ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना अजिबात आवडलेली नाही.त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहीत आपला राग व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहीले आहे की, उद्धवजींच्या वाढदिनी हा तर भाजपचा अपशकुन कौतुक राहूद्या; किमान अपशकून तरी करू नका

आज सोमवार दि.२७ जुलै, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस. आजच भारतीय जनता पक्षाने कार्यकारिणी बैठक बोलावली होती. या बैठकीतील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण मी दूरचित्रवाणीवर लाइव्ह ऐकले. संपूर्ण राज्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करीत असताना भारतीय जनता पार्टी मात्र त्यांना अपशकुन करीत आहे. त्यांच्या कामाचे कौतुक राहूद्या; किमान अपशकून तरी करू नका.

श्री ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेच जगातील २१० हून अधिक राष्ट्रांसह भारतातही कोरोना महामारीचा संसर्ग सुरू झाला . अशा परिस्थितीत प्रशासनाचा कोणताही अनुभव पाठीशी नसताना, एवढ्या कमी वेळेत कोरोनासारख्या या जागतिक महामारीवर विजय दृष्टिक्षेपात आणला असताना खरंतर आजच्या वाढदिनी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या संयमी व सुसंस्कृत आणि प्रांजळ स्वभावाचं कौतुक व्हायला हवं होतं. परंतु; ते राहिल बाजूलाच. त्यांच्यावर तोंडसुख घेऊन त्यांना अपशकुन घडवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने ही कार्यकारिणीची बैठक बोलावली. त्यांच्या या घाणेरड्या प्रयत्नाबद्दल आम्ही निषेधच व्यक्त करीत आहोत. आजच्यासारख्या चांगल्या दिवशी ‘बेइमानी’ यासारखे शब्द वापरायला नको होते. कारण, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.

या बैठकीत भाजपने अनेक विषय मांडलेले आहेत. त्यांची परवा झालेली मुलाखत, महाबीज बियाणे, युरिया, दूध इत्यादी बाबत श्री फडणवीस यांनी मत व्यक्त केलेली आहेत. परंतु; ते सोयीस्कररीत्या हे विसरले आहेत की पृथ्वी अवतरल्यापासून पहिल्यांदाच इतके महाभयानक कोरोणा महामारीचे संकट उद्भवले आहे. त्यामुळे सगळेच कारखाने गेली चार-पाच महिने बंद आहेत. त्यामुळे आमच्या सरकारच्या गेल्या पाच वर्षातील काळात असं काही नव्हतं, अशी हास्यास्पद विधाने तरी करू नका .

किमान एवढा तरी शहाणपणा शिल्लक ठेवा.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तर सातत्याने म्हणतात महाराष्ट्रातील सरकार आम्ही पडणार नाही. महाविकास आघाडीतील पक्षांच्या अंतर्गत विरोधामुळे सरकार पडेल, असाही दावा करतात. तर मग श्री फडणवीसांना माझा सल्ला आहे, की शांत राहून आमच्यातील अंतर्गत विरोधामुळे सरकार पडायची तर वाट बघा. किमान एवढा तरी शहाणपणा शिल्लक ठेवा की!

https://www.facebook.com/685408308184171/posts/3388960424495599/

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्राकडून आरोग्यविभागाला पीपीई किट्स, आणि व्हेंटीलेटर पुरवण्यात येणार

News Desk

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई

News Desk

‘पुन्हा येण्यात’ अनेकदा अपयश येऊनही प्रयत्न न सोडण्याची जिद्द बघता कौतुकही करावंसं वाटतं – रोहित पवार 

News Desk