HW News Marathi
महाराष्ट्र

नाशिक महापालिकेत शिवसेना गटनेत्याच्या कार्यालयाला आग

नाशिक | नाशिक महापालिकेमधील शिवसेना गटनेत्याच्या कार्यालयाला आग लागल्याची घटना घडली आहे. महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयाला ही आग लागली आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करत आहेत. धुराचे लोट पसरले आहेत.

घटनास्थळी ग्निशमन दलाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत, कर्मचारी आणि अधिकारी सामान बाहेर आणण्याचं काम सुरु आहे, मात्र सुदैवाने कार्यालयात कुणीही नसल्याने यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. पालिका कर्मचाऱ्यांनी आग लागलेल्या रुमचे दरवाजे तोडलेले, आग्निशामक दलाचे जावान घटनास्थळी पोहोचले, सध्यातरी आगीच्या कारणाचा प्राथमिक अंदाज सांगता येणार नाही, नंतर आगीच्या कारणाची सविस्तर चौकशी करु, असे पालिका कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साताऱ्यात ३.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, परिसरात भीतीचे वातावरण

News Desk

‘महाप्रित’ आणि पुणे नॉलेज क्लस्टर यांच्यात सामंजस्य करार

Aprna

पत्रकार संरक्षण कायद्यामुळे पत्रकारांना सत्य मांडण्याचे बळ – .खोतकर

News Desk