HW News Marathi
महाराष्ट्र

“उद्या मलाही वाटेल मुख्यमंत्री व्हावं!”

कोल्हापूर | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केल्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जयंत पाटलांच्या स्वप्नाविषयी विचारलं असता, त्यांनीही साजेशी मिश्किल प्रतिक्रिया दिली. ‘उद्या मला वाटलं तर काय करु?’ असा प्रतिप्रश्न करत शरद पवारांनी पत्रकारांना विचारला आणि त्यांना गप्प केलं.

“उद्या मला वाटलं तर काय करु?”

कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे, मराठा आरक्षण, महाविकास आघाडी सरकार, जयंत पाटील यासारख्या विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली आहे, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यास पत्रकाराने सुरुवात केली. त्यावर “मग काय झालं काय?” असा उलट प्रश्न पवारांनी विचारला. “काही संधी आहे का?” असं विचारत पत्रकाराने आपला प्रश्न पूर्ण केला. तेव्हा “उद्या मला वाटलं तर काय करु? मला कोणी करणार नाही, म्हणून मला वाटत नाही” अशी मिश्किल टिप्पणी शरद पवारांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याचे मुख्यमंत्री पोहोचले तळीये गावात, मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्री करतायेत पाहणी…..!

News Desk

ब्राह्मण असल्याने मला टार्गेट केलं जातंय! देवेंद्र फडणवीसांचा रोख कोणावर?

News Desk

शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण ही अपमानास्पद बाब – गोपीचंद पडळकर

News Desk