HW News Marathi
व्हिडीओ

राणे कुटुंबाला भाजपचं गिफ्ट, नारायण राणेंना सुरक्षा तर निलेश राणेंना ‘हे’पद!

राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपला ठाकरे सरकारनं दणका दिला होता. राज्यातील बड्या भाजप नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्याचा मोठा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला होता. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेते चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, नारायण राणे यांच्यासह मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.. ठाकरे सरकारच्या या निर्णयात आता केंद्र सरकार आले आहे. भाजप नेते नारायण राणे यांना केंद्राने Y दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने राणेंना Y दर्जाची सुरक्षा दिली आहे. ठाकरे सरकारनं सुरक्षा काढल्यानंतर मोदी सरकारकडून नारायण राणेंना सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसह इतर भाजप नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली होती. यानंतर राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. एकीकडे नारायण राणे यांना केंद्राने सुरक्षा दिली आहे तर दुसरीकडे निलेश राणे यांची भाजप प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे… राणे कुटुंबाला एक प्रकारे गिफ्ट दिलं असंच म्हणता येईल. #NarayanRane #NileshRane #BJP #UddhavThackeray #Mahavikasaghadi #SharadPawar #DevendraFadnavis #RajThackeray #ChandrakantPatil #NarendraModi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोकणातील शिमग्यात संकासूरावरही ‘Srivalli’चा फिव्हर

News Desk

“आजही दिल्लीने इथले लोक फितूर केले पण…”; Sanjay Raut यांचा पुन्हा BJP वर निशाणा |

News Desk

Charkop मधून धक्कादायक प्रकार उघडकीस; 2 मुलींवर चाकूने हल्ला

News Desk