HW News Marathi
महाराष्ट्र

“सुप्रिया सुळे, नीलम गोऱ्हे, यशोमती ठाकूर हरवल्या, शोधणाऱ्यास ५०० रुपये बक्षिस देऊ” भूमाता ब्रिगेडचा स्टंट

मुंबई | राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यामुळे अडचणीत सापडले आहेत रेणु शर्मा नावाच्या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. बॉलिवूडमध्ये संधी देतो असं सांगत धनंजय मुंडेंनी माझा वापर केला असा आरोप महिलेने केला आहे. या प्रकरणी सध्या पोलीस तपास सुरू आहे, मात्र धनंजय मुंडे प्रकरणावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं आहे.

धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी भाजपच्या महिला आघाडीने ठिकठिकाणी आंदोलन केले, धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत असं म्हणणाऱ्या शरद पवारांनी पुन्हा सावध पवित्रा घेतला. तक्रारदार महिलेविरोधात ब्लॅकमेलिंगचे गंभीर आरोप झाले आहेत, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी त्यानंतर योग्य निर्णय घेऊ असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगितले. मात्र, धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कारासारखे आरोप झालेले असताना राज्यातील महिला नेत्या गेल्या कुठे असा प्रश्न भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी विचारला आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर रेणु शर्मा नावाच्या महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. मात्र, या विषयावर महाराष्ट्रातल्या महिला नेत्या जाहीर बोलायला तयार नाही, ज्या महिला नेत्या एखाद्या पीडितेवर अत्याचार झाला, तक्रार आली तर तातडीने पत्र व्यवहार करतात, ट्विट करतात, पीडितेची भेट घेतात, मग आता या महिला नेत्या गेल्या कुठे? मग यात शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे असतील, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे असो किंवा काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर असतील, या नेत्या सध्या महाराष्ट्रात नाहीत का? त्या सगळ्या हरवल्या आहेत का? आणि खरोखरच त्या बोलत नसतील तर त्यांचा शोध घ्यावा लागेल, या नेत्यांचा शोध घेणाऱ्यास भूमाता ब्रिगेडकडून ५०० रुपये बक्षिस देऊ असं त्यांनी जाहीर केले आहे.

Now
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राज्यात विरोधी पक्षाने ताळतंत्र सोडला आहे”, संजय राऊतांचा भाजपावर निशाणा!

News Desk

मुंबईतील हॉटेल 10 पर्यंत राज्यातील हॉटेल सुरु, धार्मिक स्थळे अजुनी बंद!

News Desk

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी हसन मुश्रीफांनी देशाची माफी मागावी, भाजपची मागणी

News Desk