HW News Marathi
देश / विदेश

मध्य प्रदेशचे राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालजी टंडन यांचे निधन

भोपाळ | भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन झाले आहे. प्रकृती खालावल्याने गेले काही दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

लालजी टंडन हे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे खंदे समर्थक होते. १९७८ ते १९८४ या कालावधीत ते उत्तर प्रदेश विधानपरिषदेचे सदस्य होते. तर १९९६ ते २००९ या काळात सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले. बसप-भाजप युती सरकारमध्ये मायावतींच्या नेतृत्वात त्यांनी उत्तर प्रदेश मंत्रिमंडळात नगरविकास मंत्री म्हणूनही काम पाहिले होते.

लालजी टंडन यांचे पुत्र आशुतोष टंडन यांनी सकाळी ७ वाजता ‘बाबूजी नहीं रहे’ असे ट्वीट करत लालजींच्या निधनाची दु:खद वार्ता दिली.लालजी टंडन यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळेच उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना मध्य प्रदेशचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करत लालजी टंडन यांना श्रद्धाजली वाहिली आहे. लालजी टंडन यांच्या जाण्याने देशाने एक लोकप्रिय नेता आणि प्रशासक गमावला आहे, असे त्यांनी ट्विट केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Assembly Elections 2022 VotingLive Updates : सकाळी ९ वाजेपर्यंत यूपीमध्ये ९.४५ टक्के, उत्तराखंडमध्ये ५.१५ टक्के अन् गोव्यात ११.०४ टक्के मतदान

Aprna

अभिमानास्पद! ‘नासा’च्या कार्यकारी प्रमुखपदी भारतीय वंशाच्या भव्या लालची नियुक्ती

News Desk

राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा १४, आणखी २ जणांना कोरोनाची लागण

Arati More