HW News Marathi
Covid-19

धक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्येचं ४० वर्षीय महिलेचा बलात्कार

मुंबई| नवी मुंबईमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या महिलेचा बलात्कार झाल्याची घटना उघडकीसआली आहे. डॉक्टर असल्याचे सांगून रूममध्ये प्रवेश करीत बलात्काराचा प्रकार केल्याचा गुन्हा पनवेल मधील कोरोनासेंटरमध्ये घडला आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकचं खळबळ उडाली आहे.

मुंबईपुणे एक्सप्रेसवेच्या बाजूला खाजगी बिल्डरांनी उभ्या केलेल्या गृहप्रकल्पात पनवेल महानगरपालिका आणि नवीमुंबई महानगरपालिकेने कोरोना सेंटर बनविले आहे. या कोरोना सेंटरमध्ये एकाच इमारतीत स्त्री आणि पुरूषांना ठेवण्यात आल्याने ही घटनाघडल्याचे बोलले जाते आहे. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार पनवेल मनपानेअलगिकरणात ठेवलेल्या युवकाने हे कृत्य केले आहे. अलगिकरणात इमारती मधील दुसऱ्या मजल्यावर आरोपी युवकाला ठेवले होते. तर पीडित महिला सहाव्या मजल्यावरील अलगिकरण रूममध्ये होती.क्वारंटाईन सेंटरमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे ही सेंटर्स सुरक्षित आहेत का असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वानखेडे मैदान क्वारंटाईन सेंटरसाठी घेणार नाही | आयुक्त

News Desk

देशात पुन्हा ९० हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढले

News Desk

दिलासादायक ! महाराष्ट्रातील पहिले दोन पाॅझिटिव्ह रूग्ण झाले निगेटिव्ह

Arati More